वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार तसेच अन्य उमेदवारांवर करण्यात येणारी टीका वैयक्तिक स्वरूपाची नसावी. सभेच्या परवानगीसाठी 48 तास आधी परवानगी घ्यावी. उमेदवारांचे किंवा पक्षाचे बॅनर्स-पोस्टर लावण्यासाठी जमीनमालकाचे संमत्तीपत्र व स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला आवश्यक आहे. वाहन प्रचाराची परवानगी निवडणूक अधिकारी यांच्याकडून घ्यावयाची आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ठिकाणी पोलिसांच्या परवानगींकरीता खास एक खिडकी ठेवण्यात आली असून इथूनच पोलीस निरीक्षकांच्या सहीने आवश्यक त्या परवानग्या दिल्या जाणार आहेत. निवडणुकीचा प्रचार सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत करायचा आहे. 30 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता प्रचार बंद होणार असल्याची माहिती उपस्थित अधिका¬यांनी दिली. या बैठकीला राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार उपस्थित होते.
