लक्ष्मी प्रभूखानोलकरने पटकाविला ‘वेंगुर्ले क्वीन’चा मुकुट

जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वेंगुर्ले क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत लक्ष्मी प्रभूखानोलकर (वेंगुर्ला) हिने प्रथम, रसिका धुरी (कुणकेरी) हिने द्वितीय तर नंदिनी बिले (सावंतवाडी) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तरोतर रंगत गेलेल्या या स्पर्धेत जिल्ह्याभरातील १३ सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून स्पर्धेचा आनंद लुटला.नायरा पेट्रोल पंपसमोर खुल्या मैदानात झालेल्या या स्पर्धेमध्ये स्नेहा शिरसाट (मळेवाड), शितल टिक्कस व तेजस्विनी शिरोडकर (कुडाळ), लक्ष्मी प्रभूखानोलकर व किरण मेस्त्री (वेंगुर्ला), समृद्धी पवार (कणकवली), तन्वी गोसावी (सावंतवाडी), काजल गावडे (अणसूर), नंदिनी बिले (सावंतवाडी), मनिषा गमवडे (लातूर), रसिका धुरी (कुणकेरी), कष्मिरा ठाकुर (तळवडे), दिव्या बागायतकर (उभादांडा) या स्पर्धकांनी स्पर्धेची रंगत वाढविली. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण पराडकर, पूनम बोवलेकर आणि महेंद्र मातोंडकर यांनी केले.
बेस्ट स्माईल हे पारितोषिक अणसूर गावची कन्या काजल गावडे हिने तर बेस्ट हेअरस्टाईलचे पारितोषिक कुडाळच्या शितल टिक्कस यांनी मिळविले. स्पर्धेसाठी रॅम्पवॉक कोरिओग्राफर म्हणून प्रवीण पराडकर व पंकज शिरसाट यांनी जबाबदारी संभाळली. माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, विद्यमान नगरसेविका समिधा रेडकर, संगीता नाईक, जबरदस्त सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व परीक्षकांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदन डान्स कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांनी केले. चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या मुलांनी प्रत्येक फेऱ्यांच्या दरम्यान सादर केलेले अप्रतिम नृत्यांविष्कारही रसिकांना भावले.

Leave a Reply