बॅ. खर्डेकरच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

नुकत्याच वेंगुर्ला येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना गोवा येथील एस्टीम इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. या भरती प्रक्रियेमुळे बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. दरवर्षी विविध कंपन्यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू महाविद्यालयात घेतला जातो.  त्यानुसार यंदाही महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, रसायनशास्त्र विभाग आणि करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सेल या विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. यामध्ये 15 विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. एस्टिम इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख विजय नाईक, अरुण पेठे, प्रशांत मायापूर आणि संतोष शेटकर यांनी बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील सायन्स विभागात रसायनशास्त्र पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला. यामध्ये ज्यांनी अधिक गुण मिळविले आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड केली. नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व हे शिकण्याची जिद्द, तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स यांचा समतोल, अनुकूलन क्षमता आणि व्यावसायिक शिस्तीने बनलेले असते असे प्रतिपादन विजय नाईक यांनी केले. यावेळी शि.प्र.मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा. संजय चमणकर, प्रा. सुदाम माने यांसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रभू मॅडम यांनी केले तर आभार प्रा. एस. एच. माने यांनी मानले.

Leave a Reply