भारत सरकारमार्फत राबविण्यात येणारी जनगणना 2027 ही देशव्यापी महत्त्वपूर्ण मोहीम लवकरच सुरू होत आहे. या जनगणनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे. देशातील ही पहिली ‘डिजिटल जनगणना’ असून 1 ते 15 मे स्व-गणनेची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेंगुर्ला तालुका क्षेत्रात जनगणना कार्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना 3 टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी ओंकार ओतारी यांनी दिली आहे.या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर घर यादी व घर गणना हे काम 16 मे ते 14 जून या कालावधीत पार पडणार आहे. देशातील ही पहिली ‘डिजिटल जनगणना’ असून 1 ते 15 मे स्व-गणनेची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्व-गणनेची वेबसाईट http://se.census.gov.inõ ही असून स्व-गणना पूर्ण झाल्यावर जनगणना कालावधीत प्रगणक घरी भेट देऊन स्व-गणना केलेली माहिती तपासतील. नारिकांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांना सहकार्य करून माहिती द्यावी. प्रगणकांना चुकीची माहिती देऊ नये. जनगणना ही पूर्णपणे गोपनीय प्रक्रिया असल्याने या प्रक्रियेमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असल्याची शाश्वती नागरिकांनी बाळगावी. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावेच, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.
