ग्रामीण भागातील शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या सात विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण उद्यानविद्या कार्य अनुभव’ (RHWE) कार्यक्रमांतर्गत तुळस गावात ६ महिन्यांच्या निवासी उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी तुळस ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच रश्मी परब यांच्याकडे सुपुर्द केले. या विद्यार्थी गटामध्ये ओम कुंभार, अरिन मोंडे, सिद्धार्थ चौधरी, धनंजय साळवी, अमित टोकसिया आणि दिनेश बिश्नोई आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत गावात राबवल्या जाणाऱ्या विविध कृषीविषयक उपक्रमांचा आणि विकास कामांचा संपूर्ण आराखडा विद्यार्थ्यांनी सरपंचांसमोर मांडला. हे सातही विद्यार्थी पुढील ६ महिने याच गावात मुक्कामी राहून स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबतीने काम करणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जवळून अनुभवण्याची संधी मिळणार असून, तुळस गावच्या कृषी विकासालाही एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तुळस ग्रामपंचायतीला विद्यार्थ्यांची भेट
ग्रामीण भागातील शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या सात विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण उद्यानविद्या कार्य अनुभव’ (RHWE) कार्यक्रमांतर्गत तुळस गावात ६ महिन्यांच्या निवासी उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी तुळस ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच रश्मी परब यांच्याकडे सुपुर्द केले. या विद्यार्थी गटामध्ये ओम कुंभार, अरिन मोंडे, सिद्धार्थ चौधरी, धनंजय साळवी, अमित टोकसिया आणि दिनेश बिश्नोई आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत गावात राबवल्या जाणाऱ्या विविध कृषीविषयक उपक्रमांचा आणि विकास कामांचा संपूर्ण आराखडा विद्यार्थ्यांनी सरपंचांसमोर मांडला. हे सातही विद्यार्थी पुढील ६ महिने याच गावात मुक्कामी राहून स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबतीने काम करणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जवळून अनुभवण्याची संधी मिळणार असून, तुळस गावच्या कृषी विकासालाही एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.