“स्वरसंध्या’ या संगीत मैफिलीतून कै.रमेश मेस्त्री यांना आदरांजली

वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या “स्वरसंध्या’ या संगीत मैफिलीत  अभंग, नाट¬गीत, भावगीत, भक्तिगित सादर करीत कै. रमेश मेस्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली.
वेंगुर्ला येथील तबलापटू कै.रमेश मेस्त्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माणिकचौक येथील विठ्ठल मंदिरात 11 मे रोजी “स्वरसंध्या’ ही संगित मैफील संपन्न झाली. या संगीत मैफिलीच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ज्येष्ठ गायक भाई पडवळ, सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, निवृत्त बँक अधिकारी किरण पिंगुळकर, नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, रिया केरकर, खारलँडचे निवृत्त अधिकारी विनय गरगटे, कार्यक्रमाचे आयोजक महादेव मेस्त्री आदी उपस्थित होते. या मैफिलीतून नवोदित कलाकारांना व्यासपिठ तर मिळेतच पण, ज्येष्ठ गायक सुद्धा यामध्ये आर्वजून आपली गाणी सादर करतात. त्यामुळे अनुभवी आणि नवोदित गायकांचा हा अनोखा संगम या संगीत मैफिलीला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवतो, असे प्रतिपादन प्रसन्ना देसाई यांनी केले. तर किरण पिंगुळकर यांनी कै.रमेश मेस्त्री यांच्या कलेबद्दल गौरवोद्गार काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मैफिलीच्या पूर्वाधामध्ये वेंगुर्ला येथील भाऊ बोवलेकर, शेखर चोपडेकर आणि किरण मेस्त्री यांनी विविध गाणी सादर केली. यांना हार्मोनियमवर माधव ओगले गुरूजी तर तबल्यावर शाम नाडकर्णी यांनी संगीतसाथ दिली. तसेच उत्तारार्धात राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार विजेते परूळे येथील आत्माराम गोसावी, डॉ.तेजस्विनी देसाई, सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, अमृता पेडणेकर यांनी गाणी सादर केली. यांना हार्मोनियमवर रामकृष्ण उर्फ पपू नाईक, तबल्यासाठी गौरव पिंगुळकर यांनी संगीतसाथ दिली. संपूर्ण मैफिलीचे निवेदन कु.प्रतिक्षा आरोलकर हिने केले.

Leave a Reply