केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी ओंकार खानोलकर

वेंगुर्ला तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनची सभा संदीप कडव यांच्या अध्यक्षतेखाली १७ मे रोजी हॉटेल मांडवी येथे संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी अलीकडेच आकस्मिक दु:खद निधन झालेले असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष विवेक खानोलकर यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी-ओंकार खानोलकर (वेंगुर्ला), उपाध्यक्षपदी-मकरंद देसाई (केळुस), सचिवपदी-संदीप कडव (टांक), सहसचिव-निलम गावडे (मठ), खजिनदार-रोहित नाईक (वेंगुर्ला), सहखजिनदार-संजय पुनाळेकर (वेंगुर्ला), सल्लागार-सचिन भानूशाली, प्रशांत नेरूरकर, मानसी परब (वेंगुर्ला), अतुल सावंत (होडावडा), नाना गोवेकर (शिरोडा), सदस्य-मंदार सातार्डेकर (वेंगुर्ला), कृष्णकांत नाईक (होडावडे), राजेश गवळी (आडेली), रणजीत पाटील (शिरोडा) यांचा समावेश आहे. तर आशिष पाडगांवकर व हरेश करंगुटकर यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष ओंकार खानोलकर यांनी येणाऱ्या काळातील ऑनलाईन औषधांच्या विक्रीने रूग्णांना तसेच सामाजिक आरोग्याला धोका कसा निर्माण होईल याबाबत माहिती दिली. ‘स्वस्त’ दिसणारी ऑनलाईन ऑफर आरोग्यासाठी महामागात पडू शकते. खोटी बनावट प्रिस्क्रिप्शन, बोगस व निकृष्ट औषधांचा धोका, तरूण पिढीत नशेच्या औषधांचा वाढता गैरवापर, गर्भपाताच्या औषधांची सहज उपलब्धता-आरोग्यासाठी धोकादायक, तापमान व साठवणूक नियमांकडे दुर्लक्ष आदी गंभीर धोके ऑनलाईन औषध खरेदीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. सभेच्या समारोपप्रसंगी स्व.विवेक खानोलकर यांनी घालून दिलेल्या मूल्य आणि संस्कारांच्या आधारावर आपण सर्वांनी ही संघटना वाढीस न्यावी, असे आवाहन जिल्हा कार्यकारिणी सदस्य आशिष पाडगांवकर यांनी केले.

Leave a Reply