सचिन दळवी यांना कृषी विद्यापिठाचा पुरस्कार

आरवली येथील प्रगतशील बागायतदार तथा उद्योजक पुरुषोत्तम उर्फ सचिन सदानंद दळवी यांना दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचा यंदाचा शेतकरी फेलो पुरस्कार जाहीर झाला असून १९ मे रोजी कृषी विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. गौरवपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान, सचिन दळवी यांना पुढील किमान तीन वर्षे शेतकरी संसाधान व्यक्ती म्हणून योगदान देण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Leave a Reply