मेढा-निवती ग्रा.पं.ला सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची भेट

मेढा-निवती ग्रा.पं.ला मराठी हिंदी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली. त्यांनी ग्रा.पं.च्या माध्यमातून बीज संकलन संकल्पना मांडली. आपल्या गावातील जे गावठी व इतर वृक्षाची बिया संकलन करून रोपवाटिका माध्यमातून रोपे तयार करून संपूर्ण महाराष्ट्रात त्याची लागवड करणार आहेत. बीजसंकलन करण्यासाठी मेढा ग्रा.पं.च्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, सदस्य व  ग्रामस्थ महिला बचतगट, शाळा, शासकीय अधिकारी, संस्था यांच्याकडून याचे नियोजन करावे व सहकार्य करावे असे आवाहन केले. सरपंच अवधूत रेगे  यांनी सयाजी शिंदे यांना आमचा मेढा निवती गाव यासाठी सहकार्य करेल असा शब्द दिला. या कार्यक्रमासाठी  गावातील ग्रामस्थ, महिला बचतगट, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व शासकीय अधिकारी, वनसंरक्षक सावंत साहेब व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले.

Leave a Reply