नाते शब्दांपलीकडचे…

हिंदू धर्मामध्ये श्रावणातल्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जातो. बहिण-भाऊ हे आयुष्यातलं एक अतूट नातं… या नात्याची महती सांगणारा हा सण देशभर संपन्न होतो. खूप भावनिक परंतू जिव्हाळ्याचं असणारं हे नातं सर्वांच्या जीवनात एक प्रेमाचं नंदनवन फुलवतं.

आजतागायत संगीत क्षेत्रात काम करीत असताना अनेक कलाकारांशी नाती जोडता आली. बहिण हे नातं माझ्यासाठी खूप खास होतं. त्यातील एक अतिशय प्रेमळ, जिव्हाळ्याचं नातं असलेली माझी बहिण म्हणजे गायिका मुग्धा गांवकर. धृवतारा जसा आभाळात आपल्यापासून खूप अंतरावर असूनसुद्धा त्याचं स्थान हे अढळ असतं आणि तो प्रत्येक वाटेकरूला बरोबर दिशा दाखवत असतो त्याप्रमाणे मुग्धा माझ्या आयुष्यात बहिण या नात्याने आली आणि खरंच जीवनाला एक नवीन दिशा मिळाली.

मुग्धा मूळची गोव्याची असून तिचं शास्त्रीय संगीताचं प्राथमिक शिक्षण गोव्यातच झालं. मूळात गोमंतक ही कलाकारांची भूमी असल्याने बालवयातच हे गायनाचे संस्कार तिच्यावर झाले. एक चांगली कलाकार यापेक्षाही एक उत्तम व्यक्ती म्हणून मुग्धा तू खरंच एक माझ्यासाठी आदर्श आहेस. आताचं मुग्धाचं सांगीतिक शिक्षण मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्याकडे सुरु आहे. तिच्या गाण्यामध्ये असलेली भावपूर्णता, अतिशय सुंदर आलापी, स्वरलगाव, लयकारी, तिन्ही सप्तकात फ़िरणारा सुरेल आवज, सुरेख ताना सर्वच अगदी तिच्या गाण्याला श्रवणीय बनवतं…

आमची पहिली भेट होण्याचं कारण म्हणजे मी कुडाळ येथे आयोजित केलेला पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सव. त्याआधी मी केव्हाच मुग्धाला भेटलो नव्हतो. फक्त सोशल मिडियावर तिचं गाणं ऐकलेलं. हा कार्यक्रम होण्याआधी भेट व्हावी म्हणून काही दिवस आधी पवई हिरानंदानी मध्ये ऐकलेलं तिचं पाहिलं गाणं आणि तिच आमची पहिली भेट… खूप छान बिलासखानी तोडी गायलेला मुग्धाने..

त्यानंतर अनेकदा आमच्या भेटी होत गेल्या. संजीव दादांच्या बहुतेक मैफिलीमध्ये मुग्धा तानपुरा साथीला असायची. तिचं सर्वात सुंदर सादरीकरण मी आजपर्यंत मी ऐकलं असेन तर वसंत देसाई महोत्सवात तिने गायलेला राग भीमपलास व अडाणा. किती मंत्रमुग्ध केलेलस मुग्धे त्यावेळी.. अजूनही ती मैफिल आठवली की किती छान वाटतं. खरतर यानंतरच सुरु झालं आमचं भाऊ- बहिणीच अनोखं नातं.

बहिण या नात्यातून मुग्धाने मला जर काही सुंदर दिलं असेल तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन. तिची जीवनातील अनेक सारी मुल्यतत्वे माझ्यासाठी नवा वस्तुपाठ होती. एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात घडत असताना माझ्यावर मुग्धाने बहिण या नात्याने जे संस्कार केले आहेत ते अमूल्य आहेत. माझ्या प्रत्येक सुख दु:खाच्या प्रसंगी मी ‘मुग्धे’ ही हाक मारली की मुग्धा सतत सोबत असायची. आमच्यामध्ये अनेकदा वाद व्हायचे, रुसवे-फुगवे असायचे पण केव्हाच नात्यात अंतर आले नाही. तिच्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास तिला एक व्यक्ती म्हणून प्रगल्भित बनवतात.

मुग्धासोबत सांगितीक काम करताना आलेला अनुभव ही छान होता. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक गाणी तिच्याकडून गाऊन घेतली. मानस कुमार, प्रसाद रहाणे, अभिनय रवंदे, ओंकार अग्निहोत्री, तनय रेगेवनराजशास्त्रीअशा माझ्या अनेक सांगीतिक मित्रांसोबत तिने खूप छान काम केले. एकमेकांपासून दूर असूनही आम्ही सर्वजणांनी मिळून इतके छान प्रोजेक्ट्स केले. अनेक रसिकांना ते आवडले.मुग्धाचीएकमलाआवडलेलीगोष्टम्हणजेकलेबाबतअसलेलीप्रामाणिकताआणिनवनिर्मितीचीअसलेलीआवडमुग्धाआणिप्राचीजठारयांचाआतासुरुअसलेलास्वरसखीहासहगायनाचाएकप्रयत्नहेएकत्याचेऊत्तमउदाहरणआहे.

 

मुग्धासारखी बहिण मिळणं हे खरंच माझं भाग्य होतं. माझ्या प्रत्येक लहान मोठ्या चुका सुधारून ती सतत मला बहुमोल मार्गदर्शन करत आली. तिने माझ्या प्रत्येक आनंदातयशात स्वत:चा आनंद शोधला आणि मीही.आम्हीएकमेकांकडूनअनेकगोष्टीशिकतआलोएकमेकांनाखूपआधारदिला.. प्रेमदिलं. तिने माझ्या वाढदिवसाला माझ्या जवळच्या सर्व सांगितीक मित्रांना, हीतचिंतकांना एकत्र करून मला समर्पित केलेलं गाणं ही माझ्यासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी भेट होती. ती एक उत्तम गायिकेसोबतच उत्कृष्ट निवेदिकाही नक्की होऊ शकते. तिचं बोलणं इतकं स्पष्ट आणि छान असतं की सतत ऐकत राहावं असं वाटतं.

मुग्धा आज आपली भेट होऊ शकली नाही तरी पुढच्या वर्षी आपलं रक्षाबंधन नक्की साजरं करू. तुझ्या चेहर्‍यावरील निरंतरअसलेलं हास्य मला सतत प्रेरणादायी राहो…या शुभदिनी तुला खूप खूप शुभेच्छा व सादर नमस्कार. संगीतक्षेत्रात मुग्धा गांवकर हे नाव मला अतिशय मोठं झालेलं पाहायचं आहे. या तुझ्या जीवनप्रवासात भाऊ या नात्याने मी सतत सोबत असेन तुझ्या. या शुभदिनीच फक्त या नात्याची ओळख न ठेवता जन्मभर हे पवित्र नातं असच मंगलमय राहो हीच सदिच्छा…!

लिहिण्यासारखं भरपूर काही आहे.. खरंच शीर्षकाप्रमाणे आपलं नातं शब्दांच्या पलिकडचं आहे.. अशा या माझ्या गुणी मुग्धेला भरभरून प्रेम..

 मयूर कुलकर्णीमुंबई (संगीतसमीक्षक) 7397935542

mayurklk55@gmail.com

This Post Has One Comment

  1. खूप छान नातं आह तुमचं, ते आयुष्यभर असंच राहुदे

Leave a Reply

Close Menu