कर्तृत्वान महिलांचा सत्कार

सामान्य जनतेमधील नवदुर्गांचा शोध घेण्यासाठी यावर्षी श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुपकडून तसेच फ्रेम मी मीडिया आणि व्हर्चुअल व्हेलॉसिटी सॉफ्टवेअर सोल्युशन यांच्या सहकार्यानेकलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला होता. हा उपक्रम ज्या महिलांच्या जीवनावर चित्रित करण्यात आला होतात्या महिलांचा सत्कार कुडाळ येथील जिव्हाळा आश्रमात महिला अत्याचार निवारण कक्षाच्या प्रतिमा नाटेकरआयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले आणि चित्रकार सुनील नांदोस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.

      या उपक्रमात समाजातील स्त्रिया आणि त्या करत असलेल्या त्यांच्या कामाचा गौरव आणि त्यांच्या कर्तुत्वाचा जागर या मालिकेत करण्यात आला आहे. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरुपातनऊ वेगवेगळ्या भागात दाखवले आहे. याचे दिग्दर्शन सुमीत पाटील व किशोर नाईक यांनीछायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकरआरती कादवडकरमकरंद नाईकसंकेत जाधव यांनी सांभाळले आहे. लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. तर संकेत कुडाळकरसाक्षी खाड्येधीरज कादवडकरमंगल राणेअभिषेक तेंडुलकरभरत शिंदे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

      या उपक्रमात संगित शिक्षिका योगिता तांबेगड-किल्ले सर करणा-या सुवर्णा वायंगणकरऔषधी रानभाज्या मोफत देणा-या माया शृंगारेदशक्रिया विधी करणा-या श्रद्धा कदमनिसर्गातील उपलब्ध साधनांचा वापर करुन विविध कलाकृती तयार करणा-या श्रुतिका पालकरभुकेलेल्यांची भूक भागवणा-या अन्नपूर्णा नानी‘  इंद्रायणी गावडेफुगडी संस्कृती आणि परंपरा जपणा-या आरती परब, कळसुत्री बाहुल्यांचे खेळ करुन ठाकर वारसा जपणा-या तनुश्री गंगावणेवृद्धाश्रम चालवणा-या श्रेया बिर्जे या महिलांचा समावेश आहे. या सर्व स्त्रियांना मराठी चित्रपटसृष्टीतील दीप्ती भागवतस्पृहा जोशीतन्वी पालवऋतुजा बागवेसुरुची आडारकरनयना आपटेअश्विनी कासारविमल म्हात्रेचिन्मयी राघवन यांचा समावेश होता.

      या सत्कार सोहळ्या दरम्यानजिव्हाळा आश्रमचे सुरेश बिर्जेफ्रेम मि मीडिया अध्यक्ष भरत शिंदेलोककलाकार गंगावणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन निलेश गुरव यांनी केले तर आभार सुमित पाटील यांनी मानले. ही मालिका श्रीरंगच्या युट्यूब चॅनेलवर मराठीतून आणि टाटा पॉवरच्या फेसबुक पेज वर इंग्रजीतून पाहू शकता.

Leave a Reply

Close Menu