कोरोनाबाधीत कर्मच-यामुळे वेंगुर्ल्यातील प्रमुख पोस्ट बंद

वेंगुर्ला शहरांत पोस्टाची सेवा देणारे प्रमुख पोस्ट ऑफिस गुरुवार (दि.२२) पासून कुलुपबंद करण्यात आलेले आहे. दरम्यानया पोस्टऑफिसच्या दरवाज्यावर वेंगुर्ला पोस्ट ऑफिसमध्ये कोरोना बाधित कर्मचारी मिळाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यत वेंगुर्ला पोस्ट ऑफिस बंद राहिल‘ असल्याचा फलक लावण्यांत आला आहे. मात्रया फलकावरील सुचनेत तारीखेचा उल्लेख नसल्याने ते किती दिवस बंद रहाणार आहे हे ग्राहकांना समजू न शकल्याने नागरीकांत हा चर्चेचा विषय ठरला आहे.

      या फलकांवर तारीख नमुद न केल्याने ते केव्हापासून बंद करण्यांत आले आहेहे समजण्यास मार्ग नाही. तसेच शासनाच्या निर्देशानुसार एखाद्या शासकीय अथवा निमशासकीय ऑफिसमधील कर्मचारी कोरोना बाधित आढल्यास ४८ तास ते बंद ठेवण्याचे आहेत. मात्रपोस्ट ऑफिसने लावलेल्या फलकावर तारीख नमुद नसल्याने ते केव्हा सुरु होणार हे समजून येत नसल्याने ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

      दरम्यानवेंगुर्ला तहसिलदार यांनी तालुक्यातील संबंधित शासकिय वा निमशासकिय अथवा सहकारी संस्थाआस्थापने यांना शासनाचा ४८ तासांच्या कालावधीत बंद ठेवण्याच्या नियमानुसार ते किती काळ बंद ठेवले जाईलयाची माहिती या फलकावर संबधितांनी जाहिर करावी किवा ते कधी सुरु होईल याची माहिती समजण्यासाठी संफ नंबर त्या सुचना फलकावर लिहिण्यांत यावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Leave a Reply

Close Menu