पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला सागर विश्रामगृहाच्या कामाचा शुभारंभ

पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या वेंगुर्ला येथील सागर विश्रामगृह या इमारतीची दुरुस्ती व मजबुतीकरण करणे या कामाचा शुभारंभ आज पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांनी नजिकच्या जलबांदेश्वर येथे करण्यात आलेल्या सुशोभिकरण विकासकामाचे उद्घाटनही केले. तसेच यालाच लागून असलेल्या व बांधकाम प्रक्रिया सुरु असलेल्या झुलत्या पुलाची पहाणीही केली.

      यावेळी खासदार विनायक राऊतपालकमंत्री उदय सामंतआमदार दीपक केसरकरवैभव नाईकजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मीतहसिलदार प्रविण लोकरेसार्वजनिक बांधकाम सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधवरिलायन्ट बिल्ट अप या कंपनचे ठेकेदारशिवसेना संफ प्रमुख अरुण दुधवडकरजिल्हाप्रमुख संजय पडतेजिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंतशिवसेना नेते संदेश पारकरवेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परबउपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेबाळा दळवीशहरप्रमुख अजित राऊळ माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह सेनेचे सचिन वालावलकरसुकन्या नरसुलेसंदेश निकमसुमन निकममंजुश्री आरोलकरपंकज शिरसाटसुनिल मोरजकरनितीन मांजरेकरनिलेश चमणकरसंजय गावडेमनोहर येरमसुधाकर राणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu