बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी चंद्रशेखर माडकर हे आपल्या ३४ वर्षांच्या तर महादेव करंगळे हे २६ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त झालेल्या निरोपसमारंभावेळी महाविद्यालयाच्यावतीने माडकर व करंगळे यांचा सपत्निक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
चंद्रशेखर माडकर व महादेव करंगळे यांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल व केलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी विशेष कौतुक केले. तर प्रा.एस.टी.भेंडवडे, व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.डी.आर.आरोलकर, प्रा.ए.पी.बांदेकर, प्रा.विरेंद्र देसाई, प्रा.डी.जे.शितोळे, सुरेंद्र चव्हाण, संजय पाटील व सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अशोक सावळे यांनी माडकर व करंगळे यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच सुमन करंगळे-सावंत व माडकर यांच्या भगिनी ज्योती माडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेने सेवा करण्याची संधी दिली याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळासह, प्राचार्य, डॉ.कै.एम.आर.देसाई, माजी आमदार कै.दिलीप देसाई, विद्यमान सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे-देसाई, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे माडकर व करंगळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संजय पाटील यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन तर प्रा.डॉ. आनंद बांदेकर यांनी आभार मानले.