शिदेगट संफ कार्यालयाचे उद्घाटन

वेंगुर्ला सप्तसागर बिल्डिगमध्ये १ ऑक्टोबर रोजी शिदेगट संफ कार्यालयाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिदेगटात प्रवेश केला. आज आपल्याला एकनाथ शिदेंच्या रुपाने एक चांगले मुख्यमंत्री व उदय सामंत यांच्यासारखे उद्योगमंत्री लाभल्याने या भागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

    यावेळी माजी सभापती सुचिता वजराटकर, सुनिल मोरजकर, जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, किशोर मांजरेकर, महेश सामंत, प्रेमानंद भोसले, ज्ञानेश्वर खानोलकर, आपा गावजे, प्रणाली बंगे, उमा मठकर, बाळू सावंत, कौशिक परब, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, उपसरपंच गणपत केळुसकर, बाबु कुडतरकर, जि.प.सदस्य नितीन शिरोडकर, कार्मिस आल्मेडा, युवसेना तालुकाप्रमुख दादा सारंग, उत्तम वैद्य आदी उपस्थित होते. उमेश येरम यांनी दिपक केसरकर यांचा सत्कार केला. प्रास्ताविक तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu