सॅलॅड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळची श्रुती सावंत प्रथम

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटक व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत वेंगुर्ला पर्यटन तालुका महिला समिती व तसेच लिनेस क्लब, एम.टी.डी.सी., माझा वेंगुर्ला, रोटरी क्लब, वेताळ प्रतिष्ठान, साहस प्रतिष्ठान व पर्यटन व्यावसायिक महासंघ शाखा, वेंगुर्ला यांच्यातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांच्यापासून सॅलड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळच्या श्रुती सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

     साई दरबार हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १७ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण हॉटेल  व्यावसायिक संग्राम सावंत व अशोक धुरी यांनी केले. फळे, फळभाज्या व भाज्या या पासून बनविलेल्या सॅलॅड डेकोरेशन स्पर्धेत काकडी पासून बाहुली, कारल्यापासून मगर, बेडूक, पडवळापासून साप, खोबरे व अफूच्या मुंडल्यापासून कासव, याबरोबरच प्राणी खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारच्या सॅलॅडचे आकर्षक डेकोरेशन केले होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्वेता अखिल आरोसकर (वेंगुर्ला), तृतीय क्रमांक जान्हवी सावंत (कुडाळ), चतुर्थ क्रमांक बिना प्रदीप भाटिया (वेंगुर्ला), तर पाचवा क्रमांक योगिता तांबे (कुडाळ) यांनी पटकावला.

      विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये २०००, १५००, १०००, ७५० व ५०० ची रोख रक्कमेचा पारितोषिकांचे तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रकांचे वितरण अँड. सुषमा प्रभू-खानोलकर, प्राची मणचेकर यासह मान्यवरांचे हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण झाले.

       यावेळी लिनेस क्लबच्या निला यरनाळकर, हेमा गावस्कर, प्राची मणचेकर, दिशा कर्पे, रसिका मठकर, प्रार्थना हळदणकर, रोटरीच्या वृंदा गवंडळकर, माजी सभापती स्मिता दामले, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी नगरसेविका कृपा गिरप, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर आदी उपस्थित हते.

Leave a Reply

Close Menu