मालवणचा गणेश सातार्डेकर ‘विशाल श्री २०२२‘चा मानकरी

कॅम्प येथील मधूसुदन कालेलकर सभागृहात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या  विशाल श्रीही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेत फिटनेस वॉरिअर मालवणच्या गणेश सातार्डेकरने विशाल श्री २०२२हा किताब पटकाविला. एम्पाअर व्यायामशाळा कुडाळच्या विपुल करलकरने मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डरव सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ल्याच्या चंदन कुबलने बेस्टपोझरहे किताब तर मेन्स फिजिक किताब टीम शिवाजी सावंतवाडी च्या नंदकिशोर गावडेने पटकाविला.

          स्पर्धेच्या रंगमंचाचे उद्घाटन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते तर स्पर्धेचे उद्घाटन मांद्रे-गोवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळू देसाई, प्रणव वायंगणकर, साई भोई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ, संतोष गावडे, मनोज उगवेकर, रामसिग राणे, निलेश सामंत, विष्णू परब, दादा साईल, विनायक राणे, प्रसाद पाटकर, दादा केळुसकर, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.

        स्पर्धेसाठी ३०००,२५००,२०००, १५००, व १००० अशी बक्षिसे प्रत्येक गटांसाठी ठेवली होती. मेन फिजीकसाठी ३५००, ३०००, २५००, २०००, १५००, व १००० अशी सहा बक्षिसे तसेच बेस्टपोझर २५००, मोस्ट इंपो २५०० व बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी १० हजारचे पारितोषिक अशी पारितोषिके तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना ट्राॅफी व मेडल देण्यात आली.

       गटनिहाय निकाल-५५ किलोगटा खालील-आनंदा राऊळ (एनएफए अॅकॅडमी), राहूल नाईक (ओमसाई दोडामार्ग), भिकाजी परब (प्रो फिटनेस वेंगुर्ला), चंदन कुबल (सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला), सेलविया फर्नांडीस (ओमसाई दोडामार्ग), ५५ ते ६० किलो वजनी गट-विपूल करलकर (एंपायर कुडाळ), शंकर माने (पॉवर हाऊस कणकवली), शेखबहादूर भोकते (यश फिटनेस सावंतवाडी), यासीन आजगांवकर (गावडे फिटनेस तळवडा), हितेंद्र कदम (बांदेश्वर फिटनेस बांदा), ६० ते ६५ किलो वजनी गट-गणेश सातार्डेकर (फिटनेस वॉरिअर मालवण), ओम सावंत (टीम शिवाजी सावंतवाडी), निकेत चव्हाण (पॉवर हाऊस कणकवली), ओंकार केळुसकर, भुषण खोत (वॉरिअर मालवण), ६५ ते ७० किलो वजनी गट-रामदास राऊळ (शिवाजी सावंतवाडी), राजेश हिरोजी (प्रो फिटनेस वेंगुर्ला), गणेश सरवंजे (तेंडोलकर जीम कुडाळ), सुरज साळगावंकर (गावडे फिटनेस तळवडा), शुभम परब (कुडाळ), ७० ते ७५ किलोवजनी गट-धर्मपाल जाधव (गावडे तळवडा), ज्ञानेश्वर आळवे (कुडाळ), लुईस कार्डोज (मालवण).

     मेन्स फिजिकमध्ये प्रथम सहा क्रमांकात नंदकिशोर गावडे (शिवाजी सावंतवाडी), भुषण खोत (फिटनेस मालवण), प्रणय गावडे (सातेरी वेंगुर्ला), गणेश सरवंजे (तेंडुलकर कुडाळ), चंदन कुबल व योगेश केरकर (सातेरी वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. पंच म्हणून कोल्हापूरचे संजय धुरी, गौतम कांबळे, सावंतवाडीचे सुधीर हळदणकर, कणकवलीचे विक्रांत गाड, कुडाळचे सुरज तेंडोलकर, वेंगुर्ल्याचे अमोल तांडेल, हेमंत नाईक, संतोष परब यांनी काम पाहिले. प्रास्ताविक महाराष्ट्र श्रीविजेते किशोर सोन्सुरकर यांनी, सूत्रसंचालन बादल चौधरी, निलेश गुरव व काका सावंत तर आभार माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu