विकासकामांसाठी ९ कोटी निधी मंजूर              

        जिल्हा वार्षिक नियोजनामधून वेंगुर्ला तालुक्यासाठी ९ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व शहरप्रमुख उमेश येरम यांनी दिली. 

        प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीमध्ये वेंगुर्ला नं.४, म्हापण खालचावाडा, स्वामी विवेकानंद फातरवाडा-तुळस, आसोली-राजधुरी, भोगवे-निवती, कोचरा-मायन तर शाळा वर्गखोली बांधकामामध्ये वायंगणी-सुरंगपाणी शाळेचा समावेश आहे. ग्रामीण रस्ते विकासमध्ये उभादांडा-आडारी, दाभोली ते मोबारवाडी, तुळस वाघेरी मठ, होडावडा शाळा नं.१-राऊळवाडी, आडेली आरोग्य केंद्र ते दाभाडी, शंभुभवानी पर्यंत, वेतोरे-झाराप, आसोली-बडखोल-फणसखोल, शिरोडा गावडेवाडी शाळा ते डोंगरीवाडी स्मशानभूमी, कोचरा मुख्य रस्ता ते रामेश्वर मंदिर, म्हापण-निवती, केळुस-कालवी, आरवली मुख्य रस्ता ते सोन्सुरे रस्ता, पेंडूर-सातवायंगणी-घोडेमुख, इतर जिल्हा मार्ग विकास कार्यक्रमात दाभोली-वायंगणी, आडेली-झाराप-साळगांव-माणगांव, मालवण-देवली -तारकर्ली-परुळे, होडावडे-मातोंड, लघुपाटबंधारेमध्ये कुशेवाडा आंबेगाळु नं.१ येथे बंधारा बांधणे, को.प.बंधा­-यांमध्ये आडेली-राणेवाडी व कोचरा भावई तलाव दुरुस्ती, लहान मासेमारी बंदरांच्या विकासामध्ये म्हापण-खवणे खाडी येथे मासे सुकविण्याचा ओटा बांधणे, श्रीरामवाडी येथे उतरत्या पाय­यांची जेट्टी बांधणे, कोचरा दत्तमंदिर जवळ जेट्टीजवळ मच्छिमार निवारा शेड बांधणे, नवाबाग समुद्रकिनारी खाडीलगत मासे सुकविण्या करीता ओटा बांधणे, श्रीरामवाडी येथे खाडीकिनारी जाणारा पक्का पोहोच रस्ता बांधणे, मोठ्या ग्रा.पं.ना नागरी सुविधा कार्यक्रमामध्ये उभादांडा ग्रा.पं. आवारात पेव्हींग ब्लॉक बसविणे, उभादांडा-कुर्लेवाडी तसेच रोजारिओ चर्चकडे जाणा­या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, रेडी-गावतळे गणेश घाट रस्ता करणे, रेडी गावतळे ते किशोर राणे घर रस्ता मजबुतीकरण करणे, रेडी सुकळभाटगोसावीवाडी येथे संरक्षक भित बांधणे, शिरोडा-हरिजनवाडी ते शिसामुंडगा शेटये डोंगरी रस्ता मजबुतीकरण करणे, शिरोडा-वरची केरवाडी येथे गणेश घाट बांधणे, शिरोडा यशवंतगड-बागायतवाडी रस्ता मजबुतीकरण करणे, शिरोडा बायपास रोड ते सुरुची बाग (वेळागर) रस्ता डांबरीकरण करणे, वेंगुर्ला रोड-शिरोडा-मसुरकरवाडी ते देऊळवाडी रस्ता डबरीकरणे करणे, ‘वर्ग यात्रा स्थळांमध्ये म्हापण सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण, कोचरा गुरुदेव दत्तमंदिर परिसर सुशोभिकरण, केळुस तारादेवी मंदिरास भक्तनिवास बांधणे, ग्रा.पं.ना जनसुविधा कार्यक्रमांमध्ये कर्ली मुख्य रस्ता ते सातेरी मंदिर, भवानी मंदिर पर्यंतचा रस्ता, होडावडा-भटवाडी ते आरोग्य केंद्र रस्ता, आडेली भंडारवाडी ते वजराट तिठा रस्ता, खानोली हेदीचे सखल (दत्तमंदिर) ते राऊळवाडी गवळदेव, तुळस सातेरी मंदिर ते देऊळवाडी, शंभुभवानी ते सबनीसवाडा रस्ता, पेंडूर-नेवाळेवाडी ते सातवायंगणी रस्ता, भोगवे-बिब्याची राई रस्ता, मठ बोवलेकरवाडी ते परबवाडी रस्ता, भोगवे मुख्य रस्ता ते महापुरुष मंदिर रस्ता, कोचरा मायने वेतोबा मंदिर रस्ता, वजराट जांभरमळा गोवेकरवाडी रस्ता, मातोंड सावंतवाडा मुख्य रस्ता ते मातड तळेवाडी भोम रस्ता, चिपी भरणी सातेरी रस्ता, मठ शाळा नं.१ ते मठ सतयेवाडी रस्ता, आरवली-जाधववाडी रस्ता, पेंडूर-घोडेमुख रस्ता ते कांबळीवाडी रस्ता या सर्व रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, पालकरवाडी ग्रा.पं. इमारत विस्तारीकरण, म्हापण पाटकर चौधरी सार्वजनिक स्मशानभूमी बांधणे, म्हापण निवती मुख्य रस्ता विठ्ठल मंदिर पायवाट रस्ता उर्वरित काम करणे, केळुस सार्वजनिक स्मशानभूमी कंपाऊंड वॉल बांधणे, कोचरा ग्रा.पं.व आसोली ग्रा.पं. इमारतीस विस्तारीकरण करणे तर साकव बांधकाम कार्यक्रमांमध्ये कोचरा मायनेवाडी-गोसावीवाडी येथील ओहळावर साकव बांधणे, वजराठ घोगळवाडी, राणेवाडी ते धनगरवाडी रस्त्यावरील ओहोळावर साकव बांधणे, मातोंड गावठाणवाडी येथे साकव बांधणे आदी विकास कामांचा तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामध्ये मातोंड हरिजनवाडी स्मशानभुमीला कंपाऊंड वॉल बांधणे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Close Menu