रेडी गणपती मंदिराच्या कलशाचे भव्य मिरवणूकीने आगमन

रेडी येथील प्रसिद्ध श्री द्विभुज गणपती मंदिरात श्री गजानन संपोक्षण कलशारोहण सोहळा २६ ते २८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री ढोल ताशांच्या गजरात कलशाचे रेडी येथे गणपती मंदिरात आगमन झाले.

      या भव्यदिव्य सोहळ्यानिमित्त गावात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्याला येणा-या भाविकांच्या स्वागतासाठी रस्त्यारस्त्यात रांगोळी काढण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही केली आहे. तर मंदिर परिरात विविध दुकाने थाटली आहेत. एकूण या रेडी गावात जत्रौत्सवाचे स्वरुप आले आहे.

      शुक्रवारी कलशाचे भव्य मिरवणूकीने मंदिरात आगमन झाले. तत्पूर्वी वेंगुर्ला शहरातील ग्रामदेवी श्री सातेरी व ग्रामदेव श्री रामेश्वर मंदिर परिसरात कलश नेऊन दोन्ही ठिकाणच्या देवतांना श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक रेडी येथे जाण्यास मार्गस्थ झाली. रेडी हुडा ते गणपती मंदिर अशी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीत देवस्थानचे मानकरीपुजारीगावातील लोकप्रतिनिधी यांच्यासह बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. मंगळवार दि. २८ मार्च रोजी हा कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे.  दरम्यानरविवारपासून सुरु होणा-या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीदेव गजानन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu