शाळेतील हे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जपा – एस.एस.काळे

 

       1997व्या वर्षी वेंगुर्ला हायस्कूलमध्ये दहावीत शिकणा¬या विद्याथ्र्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यास हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे, माजी क्रिडा शिक्षक जयराम वायंगणकर, शिक्षिका शामलता परब, वृंदा कांबळी, शिक्षक रवी थोरात, व्ही.एस.समुद्रे आदी शिक्षक वृंद व मुंबई, ठाणे, गोवा, कोल्हापूर आदी विविध ठिकाणांहून बहुसंख्येने आलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते. शालेय जीवन पूर्ण करुन आज विविध क्षेत्रात कार्यरत असणा¬या विद्याथ्र्यांनी शाळेतील ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जपावेत अशी आग्रहाची साद एस.एस.काळे यांनी विद्याथ्र्यांनी घातली.
दोन सत्रात हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रात वेंगुर्ला हायस्कूल येथे शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तर दुस¬या सत्रात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व स्नेहभोजन पार पडले. पहिल्या सत्रात फुलांच्या वर्षावात अतिशय अनोख्या पद्धतीने शिक्षकांचे स्वागत आणि पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर ती सध्या काय करते, तो सध्या काय करतो या परिचय सत्रात सर्वांनी आपापली ओळख करुन दिली. त्यानंतर विद्याथ्र्यांच्यावतीने ऋणानुदान जमवून माजी मुख्याध्यापक यांच्या हस्ते शाळेला 25 खुच्र्या भेट तर 5 नारळ रोपे भेट देण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणी जागवत माजी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. सामुहिक वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार कृष्णदर्शन जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद परब, विनायक वारंग, राजेश्वरी परब उर्फ सायली आंगचेकर, नितीन बांदेकर, प्रशांत परब, हेमंत कांबळी, संजिवनी परब-चव्हाण आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Close Menu