बागलाची राई येथे आरती प्रभूंच्या आठवणींना उजाळा

वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने व लेखिका वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून कवीवर्य आरती प्रभू (चि.त्र्यं.खानोलकर) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ एप्रिल रोजी बागलाची राई या आरती प्रभूंच्या आजोळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

      चिदानंद स्वामींच्या मठात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ह.भ.प.अवधूत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी आरती प्रभूंचे आजोळ असलेल्या बागलाची राई येथील बागलकर कुटुंबियांविषयी तसेच आरती प्रभू व चिदानंद स्वामींचा मठ यांचे असलेल्या नात्याविषयी सविस्तर माहिती दिली. सुधाकर ठाकूर यांनी आरती प्रभूंच्या कवी म्हणून असलेल्या वाटचालीचात्यांच्या दुःखात्मक जाणिवेतून साकारलेल्या कवितांचा आढावा घेणारे मनोगत व्यक्त केले. अजित राऊळ आरती प्रभूंच्या जीवनावरील काही प्रसंगांचे कथन केले.

      दुस-या सत्रात आरती प्रभूंच्याच कवितांचे गायन व वाचन झाले. यामध्ये सोमा गावउे यांनी निःशब्द‘, जान्हवी कांबळी यांनी दुःख ना आनंदही‘, प्रितम ओगले यांनी जाईन दूर देशा‘, प्रसाद खानोलकर ही दोन बकरीची पोरे‘, विनयश्री पेडणेकर यांनी सांगेल राख माझी‘, तर अजित राऊळ यांनी मृत्यूस कोणी हासे‘ आदी कवितांचे वाचन केले. स्वाती सावंत यांनी ये रे घनाये रे घना हे तर महेश राऊळ यांनी कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे‘ ही गीते सादर केली. वासुदेव पेडणेकर यांनी पु.ल.देशपांडे यांनी आरती प्रभूंवर लिहिलेल्या लेखाचे प्रभावी अभिवाचन केले. यानंतर प्रदीप केळुसकर यांनी चि.त्र्यं.खानोलकरांच्या नाटकांविषयी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu