श्रमदानाने तुळस घाटी परिसराची स्वच्छता

जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग, वेताळ प्रतिष्ठान तुळस तसेच वन परिमंडळ मठ यांनी तुळस घाटी परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून सुमारे ४ किलोमिटरचा परिसर स्वच्छ केला. यावेळी घरगुती कचरा, प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तू, जुने कपडे, इलेक्ट्राॅनिक टाकाऊ साहित्य, सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर, दारूच्या, कीटकनाशकाच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या व पाकिटे यांचे वर्गीकरण करून तो वेंगुर्ला न.प.च्या ताब्यात देण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत वनरक्षक विष्णू नरळे, वन कर्मचारी संतोष इब्रामपुरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सागर सावंत, सद्गुरू सावंत, महेश राऊळ, मंगेश सावंत, सुधीर चुडजी, रोहन राऊळ, प्रदीप परुळकर, रोहित गडेकर, सानिया वराडकर, विधी नाईक, प्रज्ज्वल परुळकर, प्रविण राऊळ, भूमी परुळकर, भार्गवी परुळकर, केशव सावंत, किशोर राऊळ आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वनरक्षक नरळे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबाबाबत कौतुक केले. तसेच आतापर्यंत ८ वेळा स्वच्छता मोहित राबवूनही लकांची कचरा टाकण्याची मानसिकता जैसे थे असल्याने प्रतिष्ठान व नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu