मठ हायस्कूल येथे तंत्र शिक्षण कोर्सचे उद्घाटन

उगम उपक्रमाअंतर्गत कॉज टू कनेक्ट फाऊंडेशन व नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबई यांच्या सहकार्यातून मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर येथे यावर्षीपासून तंत्र शिक्षण कोर्स सुरू करण्यात येत आहेत.  या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे उद्घाटन उपसरपंच महादेव गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक संघाचे मठ हायस्कूल नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रविण परूळेकरसचिव गिरीश पोईपकरकॉज टू कनेक्ट फाऊंडेशनचे बनसोडपालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सतीश गावडेमिलिंद खानोलकरप्रकाश मटकरकेंद्र शाळा मठ क्रमांक १ चे मुख्याध्यापक अजित तांबेदाभोली इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकररंजन कडूलकरविद्याधर कडूलकर  तसेच पालकग्रामस्थ आणि विद्यार्थीशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

      शेती व पर्यावरण तंत्रज्ञानकार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञानउर्जा व पर्यावरण तंत्रज्ञानअन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या चार विभागांचे उद्घाटन करून संबंधित शिक्षकांनी उपस्थितांना माहिती देत मार्गदर्शन केले. तर बनसोड यांनी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा भविष्यातील जीवनात कसा आणि किती फायदा होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.बी.कांबळी,  ए.पी.वाढोकार, डी.पी.मोबारकरएन.बी.नाईकए.ए. कांबळे  आणि सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

      गिरीश पोईपकर यांनी प्रास्ताविकसूत्रसंचालन जी.एम.गोसावी यांनी तर मुख्याध्यापक एस.ए.जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu