बालबोधिनी व प्राथमिकमध्ये वेंगुर्ल नं.४ चे यश

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा बालबोधिनी व राष्ट्रभाषा प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं.४ चा  निकाल १०० टक्के लागला आहे. राष्ट्रभाषा बालबोधिनीमध्ये १० तर राष्ट्रभाषा प्राथमिक १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुकास्तरावर प्राथमिक बालबोधिनीमध्ये हंसिका जगन्नाथ वजराटकर हिने तृतीय आणि राष्ट्रभाषा प्राथमिकमध्ये श्रेया नरेश किनळेकर हिने द्वितीय क्रमांक  पटकाविला. राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षा विशेष योग्यता श्रेणीमध्ये या शाळेतील वेदांत सावळाराम नाईक, वेद अभिषेक वगुर्लेकर, हंसिका जगन्नाथ वजराटकर, भूमिका भरत असनकर, खुशी पवित्र मठकर, आरती बसुराज कोळी, हिताला दिपक बागवे, रक्षा धनंजय तांडेल यांनी यश मिळवले. पहिल्या श्रेणीमध्ये नंदित नरेंद्र परब, निनाद निलेश पिंगुळी यांनी तर राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा विशेष योग्यता श्रेणीमध्ये चिन्मयी दिनकर परब, चेन्नई जगदीश किनळेकर, युक्ता संजय किनळेकर, श्रेया नरेश किनळेकर, प्रार्थवी वासुदेव परब, तनिष्का गणेश जाधव, नंदिता नरेंद्र परब यांनी मिळविला. पहिली श्रेणीमध्ये संजीव शशिकांत सुर्यवंशी, गौरेश प्रविण कुबल, हर्षिता तुषार साळगावकर, सर्वेश संतोष पिंगुळकर यांनी तर दुसरी श्रेणीमध्ये गणेश ज्ञानेश्वर लाड, दिगराज धनंजय तांडेल, धनश्री आशिष किनळेकरशशिकांत चंद्रशेखर मांजरेकर, दिपक रमेश किनळेकर, प्रियांका शरणप्पा भासगी यांनी यश मिळविले.

          सर्व विद्यार्थ्यांना संतोष परब, सुनंदा खंडागळे, राजू वजराटकर, लिना नाईक, संतोष बोडके, मुख्याध्यापक संध्या बेहेरे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि केंद्रप्रमुख श्री. आव्हाड तसेच विस्तार अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव परब, माता पालक संघ व  पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu