विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा १ ऑगस्ट रोजी स्वागत समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रा.डॉ.उज्ज्वला सामंत यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील आचारसंहितेबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर भार्गवी शिरसेकर, चिन्मय तारी, वैष्णवी गावडे, ज्योती जाधव व मेगल डिसुझा या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडून असलेल्या अपेक्षा, कॉलेज जीवनातील स्वप्ने आणि आपले ध्येय इत्यादीबाबत आपली मनोगते मांडली. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी खास मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर अशी स्पर्धा आयोजित केली होती. यात मिस् फ्रेशर म्हणून एफ.वाय.बी.एस.सी.ची मेघल डिसूजा व मिस्टर फ्रेशर म्हणून एफ.वाय.बी.कॉम.चा प्रथम सारंग हे विजेते ठरले.

Leave a Reply

Close Menu