जबरदस्ततर्फे मुलांची मोफत नेत्र तपासणी

जबरदस्त सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ राऊळवाडा व एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शाळा नं.१वेंगुर्ला शाळा नं.४शिवाजी प्रागतिक शाळा व परबवाडा शाळा नं.१ मधील पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

      डॉ.संजय जोशीडॉ.विकास लुडबेडॉ.गौरव गुरवडॉ.विष्णू गोसावी यांनी मुलांची नेत्रतपासणी केली. यावेळी मंडळाचे साबाजी राऊळ, सदस्यअजित राऊळस्वप्निल पालकरबापू वेंगुर्लेकरज्ञानेश्वर रेडकर, चंदन रेडकरमंगेश परबकौशल मुळीकविवेक राऊळज्येष्ठ सदस्य अशोक कोलगांवकर उपस्थित होते. जबरदस्त मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व शाळांमधून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu