सुपारीवरील ‘कोळे‘ रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

मालवण-घुमडे गावातील सुपारी बागांमध्ये फळांची गळती होत असल्याने वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे त्या बागांची प्रत्यक्ष पाहणी केली असता कोळे‘ या बुरशीजन्य रोगामुळे फळगळ होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत केंद्राचे रोगशास्त्रज्ज्ञ डॉ.वाय.आर.गोवेकर यांनी कोळे‘ रग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकही दाखविले.

      सहयोगी संशोधन संचालक डॉ.एम.एस.गवाणकर व किटकशास्त्रज्ज्ञ डॉ.व्ही.एस.देसाई यांनी सुपारी लागवडउत्पादन व व्यवस्थापन संदर्भात प्राथमिक माहिती दिली. यावेळी घुमडे गावातील सुपारी उत्पादक भाऊ सामंतप्रशांत बिरमोळेलक्ष्मीकांत राणेमनिष पारकरअमित आचरेकर यांच्यासह डॉ.एम.पी.सणस आदी उपस्थित होते. केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि केलेल्या तांत्रिक मार्गदर्शनाबद्दल सुपारी उत्पादक बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापिठाचे आभार मानले.

Leave a Reply

Close Menu