विचारांच्या जागरासाठी घरोघरी शिवचरित्र हवे-डॉ.कुलकर्णी

वेंगुर्ला नगर वाचनालय येथे हिंदू धर्माभिमानी आणि शिवप्रेमी नागरिकांच्यावतीने आयोजित शिवराज्याभिषेक ३५०, स्वराज्य व राष्ट्रनिर्माण या विशेष कार्यक्रमात डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक हिदु धर्मासाठी एक प्रेरणा देणारी घटना असून या शिवराज्याभिषेकाच्या अलौकिक घटनेतून छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या पुढील वारसांनी सदैव राष्ट्र उभारणीचं आणि हिदू समाजाला जागे ठेवण्याचे काम केलं याचे मूळ या शिवराज्यभिषेकांमध्ये आहे. आज आपला हिंदू समाज काहीसा निद्रिस्त असून त्याला एकत्र आणण्यासाठी शिवाजी महाराजांचे ज्वलंत हिदुत्वाचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी झालेल्या संस्कारातून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न मावळ्यांच्या साथीने साकार केले. हिंदू धर्माची पताका सदैव फडकत राहण्यासाठी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याला साडेतीनशे वर्ष होत आहेत. या अनुषंगाने शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर करून ते विचार आचरणात आणून त्यानुसार कार्य केल्यास भारत विश्वगुरू बनेल, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात अधिकृत शिवचरित्र ठेवायला हवे, त्याचे वाचन करून शिवविचार रक्तात उतरले पाहिजेत. ६ जूनला प्रत्येकाने शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने हिंदू म्हणून एक धर्म पताका प्रत्येक घरी उभारली पाहिजे असे आवाहन डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

     प्रास्ताविक बाबुराव खवणेकर यांनी केले. वक्ता परिचय प्रा.सचिन परूळकर यांनी तर मान्यवरांचे स्वागत अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर आणि अरुण गोगटे यांनी केले, तर आभार गुरूप्रसाद खानोलकर यांनी मानले. या उद्बोधन वर्गास मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माभिमानी आणि शिवप्रेमी उपस्थित होते

Leave a Reply

Close Menu