प्रदीप केळूसकर यांच्या ‘माणिकमोती’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा

कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने प्रदीप केळुसकर यांच्या माणिकमोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. वृंदा कांबळी यांनी कथानिर्मितीविषयी बोलताना केळुसकरांनी त्यांच्या ग्रामीण व नागरी जीवनातील  अनुभवविश्‍वातून कथाबीज निवडून घेतल्याचे सांगत त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या. प्रा. संतोष वालावलकर यांनी पुस्तकातील कथांचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी कोमसापच्या जिल्हा शाखेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. प्रमुख पाहुणे पी. एस. कौलापुरे सर यांनी केळुसकरांच्या एकूणच कथांची वैशिष्ट्ये सांगितली. लेखक प्रदीप केळुसकर यांनी आपल्या कथासंग्रहाच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले. आपल्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करताना केवळ लाईक्स मिळवण्यासाठी लेखन नसावे याचे भान नेहमी ठेवावे, असे अध्यक्ष आनंद वैद्य यांनी सांगितले.

      कार्यक्रमाला वाचक , रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व स्वागत सचिव सुरेश पवार, मान्यवरांचा परिचय स्नेहल फणसळकर तर सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले.

Leave a Reply

Close Menu