परप्रांतीय, नेपाळी व परदेशींबाबत माहिती द्या!

सर्व आंबा-काजू बागायतदार, रस्ते व बिल्डिग कॉन्ट्रॅक्टर, घर भाड्याने देणारे इसम आदींनी आपल्याकडे कामासाठी आलेल्या व घर भाड्याने घेवून रहात असलेल्या सर्व परप्रांतीय तसेच नेपाळी नागरीकांबाबतची माहिती त्यांचेकडे असलेल्या कागदपत्रांसह पोलीस ठाणे येथे नोंद करावी असे आवाहन वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

    आपल्याकडे विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरीक व नेपाळमधून कामगार येत आहेत. हे कामगार थोडे दिवस काम करुन परत आपल्या गावी निघून जातात. त्यातील काही इसम हे आपल्या मूळ गावी गुन्ह्याचे कृत्य करून ते लपण्यासाठी बाहेर कामास येतात. तर यातील काही कामगार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हयाचे कृत्य करून पलायन करतात. सदर कामगारांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने, त्यांचा शोध घेणे कठिण होवून जाते. तर दुसरीकडे पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठीही मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक येऊन ते हॉटेल, लॉजेस अथवा घर भाड्याने घेऊन मुक्काम करतात. अशा परदेशी नागरिकांचे सी फॉर्म भरून त्यांची माहिती पोलिस ठाणे येथे देणे बंधनकारक आहे. दरम्यान, परकीय नागरीक पर्यटक,परप्रांतीय कामगार, नेपाळी याबाबतची माहिती पोलीस ठाणे येथे देण्यास टाळाटाळ केली अथवा कळविली नाही, तर अशा व्यक्तींविरूद्ध प्रचलित कायदयानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu