मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम

शाळा सुंदर बनाव्यात, शाळेच्या भिंती बोलक्या व्हाव्यात, शाळेत अभिनव उपक्रम राबविले जावेत, मुलांना अभ्यास करताना आनंद मिळावा, शाळा सुंदर व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाहे अभियान राज्यभर राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील १३२ जि.प.प्राथमिक शाळांनी व २० माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला. प्रथम केंद्रस्तर व नंतर तालुकास्तरावर मूल्यमापन करण्यात आले. यात प्राथमिक शाळांमध्ये तालुकास्तरावर शाळा मठ नं.२-प्रथम, शाळा वेतोरे नं.१-द्वितीय आणि शाळा मातोंड मिरिस्तेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडा-प्रथम, वेंगुर्ला हायस्कूल-द्वितीय आणि अण्णासाहेब देसाई माध्यमिक विद्यालय परुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. दोन्ही गटातील विजेत्या शाळांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख व १ लाख रुपये रोख स्वरूपात बक्षिसे येऊन गौरविण्यात येणार आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला पं. स. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे यांनी अभिनंदन केले. शाळा मठ नं.२ तालुक्यात प्रथम येण्यात सर्व आजी-माजी विद्यार्थ, आजी माजी पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापिका सुनिता पाडगावकर, शिक्षक ऋतिका राऊळ, सिद्धेश्वर मुंडे, विषयतज्ज्ञ शिवानी आळवे, स्वयंसेविका सुमिदा परब आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Close Menu