अशोकाचा फुनॅल आणि आरवलीचो वेतोबा….!
राऊळांच्या वाड्यातील एक व्यक्ती विशेष म्हणजे कोलगावकरांचे धाकटे चिरंजीव अशोक ऊर्फ अशोकराव कोलगावकर. मध्यम चणीचा बांधा, गोरा वर्ण, तीष्ण नजर, चालीत सदैव पाठीला बाक आणि चौकस वृत्ती. शरीर लहानपणापासुन किरकोळ. बालपणीच्या आजारपणापासुन शरीर सुधारले नाही. कोकणातल्या वातावरणाप्रमाणे धार्मिक वृत्ती. सतत बदलत जाणारी. ‘अमक्या…