मुंबई विद्यापीठाचा ५९वा आंतर महाविद्यालयीन ‘युवा महोत्सव २०२६-२७’ ८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात संपन्न झाला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या सर्वांमध्ये कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले.या स्पर्धेत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजची विद्यार्थिनी कु.श्रेया मयेकर (B.A. LL.B 3rd Year) हिने हिंदी एकपात्री नाट्य सादरीकरण प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मराठी एकपात्री सादरीकरणात उत्तेजनार्थ बक्षिस मिळवत अंतिम फेरीसाठीची पात्रता प्राप्त केली.
वादविवाद इंग्रजी तथा ‘इंग्लिश डिबेट’ या प्रकारात सहिष्णू पंडित (LL.M 1st Year) व लिऑन पिंटो (B.A. LL.B 2nd Year) यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याद्वारे व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने इंग्रजी डिबेट प्रकारात सलग पाचव्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
‘वादविवाद मराठी’ तथा ‘मराठी डिबेट’ प्रकारात हर्षाली पाताडे (B.A.LL.B 5th Year) व भक्ती खटावकर (B.A. LL.B 3rd Year) यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवत सलग ५ वर्षे अंतिम फेरीत पात्र होण्याची विजयी मालिका चालू ठेवली.
हिंदी कथाकथन प्रकारात रोझॅन ख़ान (B.A. LL.B 5th Year) यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर मराठी कथाकथन प्रकारात गरीमा काजरेकर (B.A. LL.B 4th Year) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. ‘कोलाज निर्मिती’ प्रकारात भक्ती खटावकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. ‘मराठी वक्तृत्व’ प्रकारात अथर्व शेवडे (B.A. LL.B 2nd Year) यांनी उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली.
या युवा मोहोत्सवाची अंतिम फेरी १ सप्टेंबरपासून मुंबई येथे सुरू होणार असून सर्व पात्र स्पर्धक तयारीला लागलेले आहेत. सर्व सहभागी तसेच अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवलेल्या होतकरुंचे अभिनंदन करत, मुंबईतील अंतिम फेरीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना चेअरमन व्हिक्टर डांटस तसेच प्राचार्य डाॅ.शिल्पा मर्गज यांसह प्राध्यापक व मार्गदर्शकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
