वेंगुर्ला न.प.मार्फत २९ जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृहात “माझी वसुंधरा अभियान ७.०० व स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत “रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल तयार करणे” ही उपक्रमवजा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शहरातील (आठवी ते दहावी गट) हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध ९ मॉडेल बनविले. यात मदर तेरेसा स्कूलने(एकता वेंगुर्लेकर, शताश्री गोसावी, रिद्धी जाधव) प्रथम क्रमांक, वेंगुर्ला हायस्कूलने (प्रतीक रणभीसे) द्वितीय क्रमांक आणि रा.कृ.पाटकर हायस्कूलने (श्लोक महाजन) तृतीय क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानपत्र तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड, परीक्षक प्रा.वीरेंद्र देसाई व सुनिता स्वामी, नगरसेवक प्रणव वायंगणकर, गौरी मराठे व गौरी माईंणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परुळेकर यांनी केले.
