कै. रामा शेणई व कै. ऋतिक शिरोडकर यांच्या स्मरणार्थ आयुष चॅलेंजर मित्रमंडळ परबवाडा व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ८ ऑगस्ट रोजी परबवाडा शाळा नं. १ मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४० दात्यांनी रक्तदान करत सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन जि.प.सदस्य संजय गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा निवृत उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, माजी नगरसेवक उमेश येरम, पोलिस पाटील शिवप्रसाद परब, दाजी गवंडे, मीनल सावंत, बाळा शिरसाट, मुख्याध्यापक श्री.झोरे, समाजसेवक अधीक्षक सौरभ शिंदे, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आबा चिपकर, वैशाख गोसावी, बाबली गवंडे, राजेंद्र शेणई, आशा सेविका लक्ष्मी शेणई, नाना राऊळ आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. या शिबिरात श्वेता पिळणकर आणि लक्ष्मी पेडणेकर या दोन महिलांनी रक्तदान केला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नाना राऊळ यांनी नियोजन केले तर रामा शेणई मित्रमंडळ व संजय गावडे मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले.
