विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपतर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून २०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांचे यासाठी मोठे सहकार्य लाभले. या शिबिरात अस्तिरोग तज्ज्ञ डॉ.आर.एस.कुलकर्णी, डॉ.आशुतोष दमानिया, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.क्रांती क्षीरसागर, न्यूरोफिजीशियन डॉ. मुकुंद अंबापूरकर, बालरोग तज्ज्ञ डॉ.पूनम रायकर, नेक्रोलॉजिस्ट व जनरल फिजिशियन डॉ.प्रकाश घोगळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.मिलन सलाने, दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्राची, जनरल सर्जरी डॉ.सुरज धुमाळ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अश्विनी येखंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.शुभम तांबे यांनी रुग्णांची तपासणी करून पुढील उपचारासाठी सल्ला दिला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य व्यवस्था लक्षात घेऊन एस.एस.पी.एम.लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्यामार्फत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दररोज तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याचे जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, पं.स.सभापती शंकर घारे, जि.प.माजी अध्यक्ष समिधा नाईक, एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे डॉ.आर.एस.कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जगदीश चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र लिलके, मच्छिमार नेते वसंत तांडेल, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, यशश्री नाईक, माजी नगरसेविका श्रेया मयेकर आदी उपस्थित होते. या शिबिराप्रमाणे ग्रामीण भागातही आरोग्य शिबिर घेतले जाईल. तपासणीनंतर शस्त्रक्रिया करायची झाल्यास तिही मोफत करण्यात येईल असे प्रितेश राऊळ यांनी सांगितले.
सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी केले. तर आभार पपू परब यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी तुषार साळगावकर, कमलेश गावडे, सायमन आल्मेडा, मारुती दोडशांनट्टी, संतोष सावंत, भूषण आंगचेकर, भूषण सारंग यांच्यासह भाजप पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
