रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन आणि झांट्ये काजू, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे ६० हजार किमतीचे आरोग्यविषयक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ५० प्रकारची विविध औषधे तसेच रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असलेला स्ट्रेचर यांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना अधिक दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य तथा तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र जन आरोग्य समिती अध्यक्ष सुजाता पडवळ, जि.प.सदस्य संजय गावडे, सरपंच रश्मी परब, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचे अध्यक्ष ॲड.प्रथमेश नाईक, डॉ.राजेश उबाळे, डॉ. दाभोलकर, काजू उद्योजक स्वप्निल झांट्ये व दीपक ठाकूर, उद्योजक योगेश नाईक, पंकज शिरसाठ, तसेच जन आरोग्य समितीचे सहअध्यक्ष रवींद्र लिलके, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर, जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
