तेली समाज उन्नती मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ वेंगुर्ला शाखेतर्फे २६ जुलै रोजी वेंगुर्ला-भटवाडी येथील वैभव तुळसकर यांच्या निवासस्थानी तेली समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष तुकाराम तेली, सचिव दशरथ कवठकर, परशुराम झगडे, ज्येष्ठ नागरिक उल्हास तळवडेकर, उद्योजक कुणाल वरसकर, तालुका अध्यक्ष सुनिल नांदोसकर, विद्याधर वरसकर, अॅड.मनिष सातार्डेकर, अशोक पेडणेकर, आना सातार्डेकर, नम्रता वरसकर, प्रविण सातार्डेकर, वैभव तुळसकर, वैभवी तुळसकर, सीमा तुळसकर, बिपीन वरसकर, संतोष खानोलकर, नियान तेली आदी उपस्थित होते.
स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर चांगले संस्कार, जिद्द, चिकाटी, मेहनत, सचोेटी आवश्यक आहे. तसेच वाचन संस्कृती रूजवा आणि स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेऊन स्वत:सोबतच समाजाचा नावलौकीक करून जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन उल्हास तळवडेकर यांनी केले.
नोकरीच्या मागे न धावता गाव ते एक उद्योग उभारून स्वत:चा उत्कर्ष साधा असे आवाहन कुणाल वरसकर यांनी केले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यशाबरोबर अपयश पचवले पाहिजे, असे अॅड. मनिष सातार्डेकर यांनी स्पष्ट केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तेली समाजातील दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सानिका वरसकर, नवनाथ सातार्डेकर, सुधिर डिचोलकर, शिला नांदोसकर, ऐश्वर्या वरसकर, अक्षय पेडणेकर, प्रशांत वेंगुर्लेकर, योजना वरसकर, दिपेश वरसकर, अमृता वरसकर, शुभांगी तेली, गौरव वरसकर यांसह बांधव-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सीमा तुळसकर यांनी मानले.

Leave a Reply