वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

                 वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अरुण काणेकर स्मृती पुरस्कार ‘कोकण प्रभात’चे संपादक योगेश जयराम तांडेल यांना, संजय मालवणकर स्मृती पुरस्कार ‘दै.लोकमत’चे वेंगुर्ला प्रतिनिधी प्रथमेश विजय गुरव यांना, पी.ए.केसरकर स्मृती पुरस्कार ‘दै.पुढारी’चे वार्ताहर अजय अशोक गडेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

      दरम्यान, विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या बैठकीवेळी अध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष के.जी.गावडे, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस.एस.धुरी, सदस्य योगेश तांडेल, प्रथमेश गुरव, सुरज परब, भरत सातोस्कर, अजय गडेकर व जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक उपस्थित होते. 20 जानेवारी रोजी सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे होणाऱ्या पत्रकारांसाठीच्या जिल्हास्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचा क्रिकेट संघ सहभागी होणार असून यासाठी संघ निवड या बैठकीत करण्यात आली.

Leave a Reply