भगवद् भक्ती सिंधुदुर्गच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीची सभा दत्तमंदिर सभागृह, राऊळ महाराज मठ, पिंगुळी येथे अलीकडेच संपन्न झाली. दर तीन वर्षांनी या संस्थेच्या कार्यकारणीची निवड सर्व कीर्तनकारांतून केली जाते. सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये मागील जिल्हाध्यक्ष संजय पुनाळेकर (वेंगुर्ला) यांची पुन्हा एकदा त्यांचे कार्य उत्कृष्ठ असल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर प्रबोधिनीच्या सेक्रेटरीपदी हृदयनाथ गावडे (साळगांव) आणि खजिनदारपदी प्रशांत धोंड (पिंगुळी) यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी पुरूषोत्तम काजरेकर (जांभवडे), सदस्यपदी दिनकर प्रभू केळुसकर (कुडाळ), किशोर राणे, गुरूदास केळुसकर (कणकवली), रामचंद्र मेस्त्री (कालेली), महेश बोवलेकर (मठ-वेंगुर्ला), अवधूत नाईक (वेंगुर्ला-वायंगणी), केतकी सावंत (पोखरण), शेखर पाडगांवकर (मळगांव), अरूण सावंत (वेंगुर्ला), श्रद्धा ठाकूर (म्हापण) यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १७५ कीर्तनकारांची ही संस्था असून यातील बहुतांश कीर्तनकार सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक येथे कीर्तने सादर करीत असतात. या संस्थेमार्फत श्रावणमास कार्यक्रम, ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा कार्यक्रम, तुकाराम बीज कार्यक्रम, नारद जयंती कार्यक्रम असे उपक्रम घेतले जातात. अनेक नवोदित कीर्तनकारांनाही मार्गदर्शन केले जाते.
