युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६ च्या वतीने कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांची गौरवार्थ निवड केली जाते. या निवडीनुसार, वेंगुर्ला येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व सौरभ माळवदे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची आणि कर्तृत्वाची दखल घेत ‘महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार २०२६’ जाहीर झाला होता. हा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते सौरभ याला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा श्री गणेश संस्थान, रेल्वे स्टेशन जवळ, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे येथे पार पडला. सौरभच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. सौरभ याने टी.व्ही.वरील विविध मालिकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. तो वेंगुर्ला शहरतील डूबळेगल्लीतील रहिवासी असून लहान वयापासूनच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रीय आहे.
