वेंगुर्ला आगारातून तालुक्यासह लांब पल्ल्याच्या बस फे­-यांना प्रारंभ

राज्य परिवहन वेंगुर्ला आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूरपाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली, दाभोली मार्गावर सकाळ, संध्याकाळ अशा एकूण ६४ फे-या सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगाराचे आगारप्रमुख जी.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

      जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी वेंगुर्ल्याहून सध्या सकाळी ६.३० वा. रत्नागिरी, ७ वा. अक्कलकोट, ८ वा. पूणे, ८.३५ वा.कोल्हापूर, ११ वा.कोल्हापूर, दुपारी २ वा. कोल्हापूर अशा फे-या सुरु करण्यात आल्या आहेत.

      शासनाने राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे वेंगुर्ला आगारातून सकाळी ६ वा. वास्को व परत ९.३० वास्को ते वेंगुर्ला अशी बस सुरु केली अहे. पणजी-गोवा परिसरात जाणा-या येणा-या जनतेला सोयीस्कर म्हणून सदर बसची वाहतुक दि.२८ सप्टेंबरपासून चालू करण्यात येत आहे. शासनाच्या कोविड-१९ नियमावलीच्या अधिन राहून सदरची वाहतूक करण्यात येणार आहे.

      शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्य परिवहन गाड्यातून पूर्ण क्षमतेने १०० टक्के प्रवाशी वाहतूक चालू करण्यात आली आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच मासिक पास सवलत, ज्येष्ठ नागरीक सवलत, दूर्धर आजार सवलती, संगणक कोर्स, टायपिगसाठी ६६ टक्के सवलत पूर्वीप्रमाणेच सर्व सवलती व पास देण्याची कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे.

      तरी जनतेने वरील सर्व गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला आगारप्रमुख जी.एस.चव्हाण केले आहे.

This Post Has One Comment

  1. ज. अ. रेडकर.

    वेंगुर्ला – वास्को आणि परत या मार्गावर तूर्तास तरी बस वाहतुक करू नये. कारण वास्को परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट आहे.

Leave a Reply