‘स्वच्छता लीग 2026’ स्पर्धेत शेकडो खेळाडूंनी सिद्ध केली क्रीडा गुणवत्ता

  वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या 150व्या वर्षात पदार्पण केले आहे. येत्या 26 मे 2026 रोजी हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी 18 व 19 एप्रिल या कालावधीत कॅम्प येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगण येथे ‘स्वच्छता लीग 2026’ अंतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, गोळाफेक, धावणे, महिलांसाठी विशेष रस्सीखेच व पुरूषांसाठी पोहण्याच्या स्पर्धांमध्ये सुमारे 450 हून अधिक खेळाडूंनी आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, कसई दोडामार्ग मुख्याधिकारी संकेत गायकवाड, वाभवे-वैभववाडी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांसह वेंगुर्ल्यातील तसेच जिल्ह्यातील नगरसेवक, कर्मचारी  उपस्थित होते.
             संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे – पुरूष क्रिकेटमध्ये सावंतवाडी न.प.विजेता तर वाभवे-वैभववाडी न.पं. उपविजेता, महिला क्रिकेटमध्ये कुडाळ न.पं.विजेता तर वेंगुर्ला न.प.उपविजेता, पुरूष बॅडमिंटन डबल्समध्ये वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप व नगरसेवक विनय नेरूरकर यांनी विजेतेपद तर कणकवली न.पं.चे संकेत नाईक व सुमित कुबल उपविजेते, महिला बॅडमिंटन एकेरीत कणकवलीच्या जयश्री ठाकरे यांनी प्रथम, तर वेंगुर्ल्याच्या पूर्वा मसुरकर उपविजेत्या, पुरूष बुद्धिबळ स्पर्धेत कसई दोडामार्ग मुख्याधिकारी संकेत गायकवाड विजेते तर कणकवलीचे अमोल आघमे उपविजेते, महिला बुद्धिबळ स्पर्धेत वेंगुर्ल्याच्या पूर्वा मसुरकर यांनी विजेतेपद तर कणकवलीच्या जयश्री ठाकरे उपविजेत्या, महिलांच्या चुरशीच्या ठरलेल्या रस्सीखेच स्पर्धेत वेंगुर्ला न.प.विजेता तर कुडाळ न.पं.उपविजेता, गोळाफेक स्पर्धेत महिला गटामध्ये वैष्णवी पेडणेकर (कुडाळ)-प्रथम, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर (कुडाळ) आणि वेंगुर्ला नगरसेवक गौरी मराठे द्वितीय, पुरूष गोळाफेक स्पर्धेत दत्तप्रसाद नांदोस्कर (वेंगुर्ला)-प्रथम, शुभम लाखे (सावंतवाडी)-द्वितीय, हेमंत चव्हाण (वेंगुर्ला)-तृतीय, 100 मी. धावणे महिला-वैष्णवी पेडणेकर (कुडाळ)-प्रथम, वेंगुर्ला नगरसेवक समिधा रेडकर-द्वितीय, प्रणाली कोटेकर (वेंगुर्ला)-तृतीय, 100 मी. धावणे पुरूष – सुजल मुणगेकर (कणकवली)-प्रथम, वामन पालकर (दोडामार्ग)-द्वितीय, रघुनाथ जाधव (वेंगुर्ला)-तृतीय, कॅरम स्पर्धेत पुरूष गटात युवराज मेहत्तर (सावंतवाडी) – विजेता तर निवेद कांबळे (दोडामार्ग)-उपविजेता, महिला कॅरम स्पर्धेत वेंगुर्ला नगरसेवक लीना म्हापणकर विजेता तर विणा वेंगुर्लेकर उपविजेत्या, पुरूषांसाठी आयोजित स्विमिंग स्पर्धेत ध्रुव गवंडळकर (वेंगुर्ला)-प्रथम, राहूल कांबळे (वेंगुर्ला)-द्वितीय तर भूषण कामतेकर (मालवण) तृतीय. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वेंगुर्ला नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

Leave a Reply