न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच्या निर्देशाप्रमाणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश डी. वाय.रायरीकर…

0 Comments

दत्तक पालक अंतर्गत ४२ विद्यार्थी दत्तक

         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला मार्फत शिक्षक समितीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दत्तक पालक उपक्रम सलग दुस­या वर्षी राबविण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील १४ केंद्रामधून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण ४२ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. शिक्षक समितीच्या शिलेदारांनी या…

0 Comments

शाळांतील रिक्त पदांमुळे मुलांचे अतोनात नुकसान!

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत सुमारे 1150 शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आबाळ होत असून प्रचंड मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या कोकण विभागात येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्ये अतितीव्र आहे. यासाठी शासनाकडून विलंबाने होणारी…

0 Comments

जीएंना अनोखी आदरांजली – जागर अभिवाचनाचा

“मराठी कथा साहित्यातील मानदंड आणि जागतिक साहित्यात ज्याचे नाव अभिमानाने घ्यावे असा हा आमचा मराठी साहित्यिक.” श्री. गंगाधर गाडगीळ यांनी जीएंचा असा गौरव केला आहे. ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 10 जुलैला झाली. त्यानिमित्ताने जी.ए. शताब्दी संस्मरण 11 डिसेेंबर…

0 Comments

श्री रामेश्‍वर सप्ताहाची उत्साहात सांगता

वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्‍वराच्या सुरू असलेल्या प्रसिद्ध अखंड भजनी सप्ताहाची सांगता काल्याच्या पालखीने 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात झाली. 4 ते 10 जुलै या कालावधीत पारंपरिक अष्टोप्रहर भजनांसोबतच तालुक्यातील वारकरी व संगीत मंडळांची भजने संपन्न झाली. तर रामेश्‍वर व राम मंदिरात पौराणिक…

0 Comments

सुतार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव

सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम ९ जुलै रोजी झाराप येथील मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उद्घाटन झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यसनमुक्ती तसेच मधुमेह मुक्ती मार्गदर्शक रिया सुतार, उद्योजक सुरेश…

0 Comments

खर्डेकरच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या बी.के.सी असोसिएशन या माजी विद्यार्थी संघटनेने खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, स.का.पाटील (मालवण) कॉलेजचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, वेंगुर्ल्याचे नूतन तहसिलदार ओंकार ओतारी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल…

0 Comments

पिल्लाई इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य करार

नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व महाविद्यालयांना इतर संस्थांशी जोडले राहणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक चौफेर ज्ञान मिळवून देण्याच्या दृष्टीने मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसोबत विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने पनवेल येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सोबत पुढील…

0 Comments

पप्पू परब यांची निवड

वेंगुर्ल्यातील सरपंच व उपसरपंच यांची सभा ९ जुलै रोजी भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत सरपंच व उपसरपंच  संघटना अध्यक्षपदी परबवाडा उपसरपंच पप्पू परब यांची निवड तर उपाध्यक्षपदी अणसूर सरपंच सत्यविजय गावडे व भोगवे सरपंच प्रणिती आंबडपालकर,…

0 Comments

‘डॉक्टर डे‘ निमित्त वृक्षारोपण

इनरव्हिल कल्ब ऑफ वेंगुर्ल्याच्यावतीने ‘डॉक्टर डे‘ साजरा करण्यात आला. अध्यक्ष वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते इनरव्हिल सदस्य डॉ.अफशान कौरी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ज्योती देसाई यांच्या बागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आकांक्षा परब, रशिका मठकर उपस्थित होत्या.

0 Comments