“श्रीगणेशा आरोग्याचा” अंतर्गत ८६ जणांची मोफत आरोग्य तपासणी

      "श्रीगणेशा आरोग्याचा" अंतर्गत गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ८६ जणांची तपासणी करून औषधे देण्यात आली.  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सौजन्याने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने "श्रीगणेशा आरोग्याचा" हे आरोग्य…

0 Comments

रूग्णांना शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा आधार

वेंगुर्ला शहरातील सर्व नागरिकांसह दुर्गम भागातील लोकांना तसेच कातकरी समाजाला मोफत चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अडीच वर्षात सुमारे २२ हजार नागरिकांनी येथील आरोग्य सुविधेचा लाभ घेतला आहे. समाजातील सर्वच लोकांना आरोग्या…

0 Comments

विशेष मोहिम राबवून सुद्धा मोकाट गुरे फिरण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ 

वेंगुर्ला शहरात मोकाट गुरांविरोधात विशेष मोहिम राबवून सुद्धा मोकाट गुरे फिरण्याची परिस्थिती 'जैसे थे' राहिल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या गणेश चतुर्थीचे दिवस असून शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. एकिकडे होणारी वाहतूक कोंडी तर दुसरीकडे मोकाट गुरे रस्त्याच्या मधोमध…

0 Comments

गणरायाच्या उत्सवात माणुसकीचा ‘शिधा’

गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण. या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, या भावनेतून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम १३ सप्टेंबर रोजी  वेंगुर्ला साईदरबार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग…

0 Comments

वेंगुर्ला आगाराच्या मोफत वाचनालय उपक्रमाला पुस्तके प्रदान 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला एसटी आगारात प्रवाशांसाठी मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या उपक्रमांतर्गत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्यावतीने प्रवाशांना विविध विषयांचे मार्गदर्शन करणारी तसेच सामान्य ज्ञान, शिक्षण, सामाजिक विषय आणि इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती देणारी…

0 Comments

माजी विद्यार्थी प्रसन्ना देसाई यांच्याकडून पुस्तकांची भेट

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई आणि नीट परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. हा कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या पुस्तकांमुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार…

0 Comments

संगणक शिक्षकाचे एक वर्षाचे मानधन आगाऊ अदा 

ज्ञानदा विकास संस्थेच्यावतीने संगणक शिक्षकाचे सुमारे एका वर्षाचे मानधन आगाऊ देऊन विद्यार्थ्यांची असलेली संगणक शिक्षकाविना होणारी गैरसोय दूर केली आहे. संस्थेने केलेल्या या सहकार्याबद्दल शिक्षकांसह पालकांनीही संस्थेचे आभार मानले. दाभोली शाळा क्र.१ या शाळेमध्ये संगणक यंत्रणा कार्यरत आहे. परंतु, संबंधित शिक्षकाच्या मानधनाअभावी संगणक…

0 Comments

रानभाज्या स्पर्धेत जाई नाईक प्रथम

माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहर स्तर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत रानभाजी पाककृती स्पर्धा ६ सप्टेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संपन्न झाली. रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा…

0 Comments

नमो उद्यानामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल – पालकमंत्री

केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेस नमो उद्यान विकासासाठी रुपये १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार कॅम्प-भटवाडी येथील नगरपरिषद मालकीच्या जागेवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. उद्यानात नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, बैठकीची व्यवस्था, योग व…

0 Comments

५२ वर्षांची अखंड सेवा : आबा साळुंखे यांचा वेंगुर्ल्यात गौरव

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील खरसुंडी या गावातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने गौरव करण्यात आला. माणिकचौक विठ्ठल मंदिरात १ सप्टेंबर रोजी…

0 Comments