कर्तव्य बजावताना पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळाले पॉझिटीव्ह

आरोग्य विभागाच्या साथीने गावात रॅपिड टेस्ट करताना साथ देऊन कर्तव्य बजावत असताना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील १ अधिकारी व १० कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत आहोत. तरी नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात येताना सर्वतोपरी दक्षता घ्यावीअसे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले आहे.

      दरम्यानअगोदरच कमी असलेल्या पोलीस स्टॉफमुळे इतर पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे. पॉझिटीव्ह आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांवर आरोग्य विभागामार्फत उपचार सुरु आहेत.  तसेच पोलीस ठाण्यामध्ये शासकीय नियमांचे पालन करून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी पोलीस ठाण्यात येताना काळजी घ्यावीकिंवा काही माहिती हवी असल्यास दूरध्वनीवर संफ साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu