याचसाठी केला होता अट्टाहास

भारतातील सुप्रसिद्ध पुरातन क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर. भूलोकीचे वैकुंठअशी संज्ञा संत महात्म्यांनी दिली आहे. या वैकुंठ नगरी पंढरपुरातील आराध्य दैवत म्हणजे श्री पांडुरंग. पायीवारीही चिज आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी सरकारी कार्यालयातून निवृत्त झाल्यावर वयाच्या ६५ वर्षी मी काही मित्रांसोबत पुणे येथील एका दिंडी संस्थेत सामील झालो.

    ‘वारीयाचा अर्थ येरझार.‘ ‘वारकरीहा शब्द नित्य नियमाने विठ्ठलाची उपासना करणा-या भक्ताला लावला जातो. दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इतर संतांच्या पालख्यांच्या सोबत पंढरीच्या वाटेने निघते. प्रत्येक दिंडीत सुमारे १०० ते १००० वारकरी असतात. दिंडीचे प्रस्थान सूर्योदयाच्या सुमारास होऊन सुर्यास्ताच्या दरम्यान आपापल्या नियोजित जागी विसावतात. वारकयांची राहण्याची व्यवस्था दिंडी चालक करतात. अनेक ठिकाणी गावकरीच सेवाभावाने वस्ती केलेल्या वारक-यांची भोजनाची व्यवस्थाप करतात. या वारीवेळी चहापाणी, पानतंबाखू, विडी, चप्पल दुरुस्ती, केशकर्तनालय, खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने, पावसापासून संरक्षणासाठी इरली, घोंगड्या, खोळ, छत्र्या, गावठी औषधे वारकरांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी उपलब्ध असतात.

    दिडीची रचना पारंपारिक पद्धतीने असते. दिड्यांचे प्रतिक म्हणून एक अश्वारुढ झालेला सेवेकरी हातात भगवा झेंडा घेऊन दिड्यांसमोरुन फिरत असतो. वारीमध्ये अभंग, भारुडे आदींसोबतच फुगड्याही घातल्या जातात. तर काही वारकरी हातात भगवे झेंडे, त्यांच्यामागे तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या तसेच तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन चालताना महिला दिसतात.

    या वारीत अनेक सांप्रदायाचे, निरनिराळ्या ज्ञातीचे, लहान-थोर, गरीब-श्रीमंत माऊलीपहायला मिळतात. अलिकडे तर डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक वगैरे तरुणाई या वारीकडे आकर्षित होताना दिसते. एक जयतुंबी नावाची महिला आपल्या मुस्लीम बांधवांसोबत पायी वारीत सामील व्हायची व किर्तनाच्या माध्यमातून संतांचे अभंग गात समाजप्रबोधन करीत असे.

    पंढरपुरात नवमी/दशमी या दिवशी विसावणा-या दिड्या जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घेतात, तेव्हा याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा.असे भाव प्रत्येक वारक-याच्या चेह-यावर दिसते. वारकरी लोक पाणावलेल्या डोळ्यांनी परतीच्या मार्गाला लागतात. वारी भौतिक ज्ञानाबरोबर बरेच काही शिकवून जाते. ईश्वरावरील निष्ठा, सर्वधर्मसमभाव, विषय सुखाची लोपणारी लालसा, सहाय्य करण्याची वृत्ती अशी शिदोरी घेऊन वारकरी आपल्या घरी जातात.                                 

                                                               – वासुदेव मंगेश राजाध्यक्ष, ९९६९३४४२००

 

Leave a Reply

Close Menu