बीच रस्सीखेच स्पर्धेत पुरूष गटात पंजाब तर महिला गटात केरळ विजेते

टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे नं. ३९ मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने शिरोडा-वेळागर बीचवर आयोजीत केलेल्या ३५ व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅम्पीयनशिप २०२२ स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरूष गटातून पंजाब संघाने गुजराथ संघावर मात करीत तर महिलांच्या केरळ संघाने हरीयाणा संघावर मात करीत सुवर्ण पदक पटकाविले.

      शिरोडा-वेळागर येथील बीचवर आयोजीत केलेल्या ३५ व्या राष्ट्रीयस्तरावरील सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅम्पीयनशिप २०२२ स्पर्धेत १८ राज्यातील ४३ संघातील ६६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ३० मे रोजी पार डलेल्या अंतिम सामन्यात पुरूष संघ ५६० किलो वजनी गटांत पंजाब संघाने सुवर्ण पदकगुजराथ संघाने रौप्यपदक तर अरूणाचल प्रदेश संघाने कास्यपदक पटकाविले. पुरूष संघ ५८० किलो वजनी गटांत पंजाब संघाने सुवर्णपदककेरळ संघाने रौप्यपदक तर हरीयाणा संघाने कास्यपदक पटकाविलेमहिला ४८० किलो वजनी गटांत केरळ संघाने सुवर्णहरीयाणा पॉवर संघाने रौप्य तर गुजराथ संघाने कास्यपदक पटाविले. पुरूष व महिला मिक्स ६०० किलो वजती गटांत पंजाब संघाने सुवर्णपदकहरीयाणा संघाने रौप्य तर गुजराथ संघाने कास्यपदक पटकाविले.

      यावेळी राष्ट्रीय रस्सीखेच संघटनेचे सचिव मदन मोहनमहाराट्र राज्य रस्सीखेच्या अध्यक्षा व आशियाई रस्सीखेचच्या सचिव माधवीताई पाटीलराज्य सचिव गुपीलेसंयोजक जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष तथा वेळागर सर्व्हे नं. ३९ चे नेते जयप्रकाश चमणकरट्रेनिंग हेड एन.के.चक्रवर्तीनिर्णय समिती प्रमुख प्रमोद जोशी आदी उपस्थित होते.

      या स्पर्धेचे यशस्वी नियोजन व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव किशोर सोनसुरकरशिराडा-वेळागर सर्व्हे नं. ३९ मधील संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष उदय भगतआजू आमरेसुधीर भगतआग्नेल सोजफास्कु फर्नाडीसनेल्सन सोजसंतोष भगतअब्राव मेमननिलेश चमणकरश्वेता चमणकर यासह सर्व्हे नं. ३९ संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या सर्व संघांच्या खेळाडूंना पॉवरलिफ्टींगमधील महाराष्ट्र लेडी किताब विजेत्या अनुजा तेंडोलकर व सामाजिक कार्यकर्ते रवि गोडकर यांनी मिठाई वाटून सर्वांचे स्वागत केले.

      या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडतेसावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळउपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेअजित राऊळशिरोडा सरपंच मनोज उगवेकरउपसरपंच राहूल गावडेरेडी सरपंच रामसिंग राणेआरवली सरपंच कुडवदोडामार्ग रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष प्रा. मंडयेदिवाकर माळवणकरवेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.

Leave a Reply

Close Menu