‘आनंदाचा शिधा‘ वाटप

महाराष्ट्र शासनाने गुढीपाडव्यानिमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही कारणास्तव विलंब झाला. दरम्यान, आता आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. त्यामुळे परुळेबाजार येथील धान्य दुकानातुन शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, ग्रा.पं.सदस्य  प्रदिप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, पुनम परुळेकर, सचिन देसाई, सेल्समन जयवंत राऊळ, बाबू घोगळेतलाठी  मिलिंद कुडतरकर व ग्रामस्थ उपस्थित होते. १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळाल्याने शिधा पत्रिकाधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

Leave a Reply

Close Menu