नवे शैक्षणिक धोरण परिपूर्ण आहे काय?

येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणमंत्र्यांनी नविन शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, याची प्रत्यक्षात  अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करावा अन्यथा काहीतरी करुन दाखविण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल या जबाबदार कोण? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शिक्षण संस्था चालक इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

      नवे शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी पूर्ण होणार का? आर्टस, कॉमर्स, सायन्सऐवजी नववीपासूनच संबंधित शाखांचे विषय निवडून ते बारावीपर्यंत घ्यायचे आहेत. त्यादृष्टीने आवश्यक असलेली नवी पुस्तके छापून पूर्ण होणार का?, दहावी बोर्डपरीक्षेऐवजी नववी ते बारावी दरवर्षी दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा होऊन ते माक्र्स बारावीच्या अंतिम परीक्षेतही मिळवले जाणार आहेत. नववी ते बारावी पर्यंतचे विषय पारंपरिकच असणार आहेत की त्यात कालनिहाय काही नवे विषय अंतर्भूत होणार आहेत?, ज्या माध्यमिक शाळा फक्त दहावीपर्यंतच आहेत व जे उच्च माध्यमिकचे वर्ग सिनियर कॉलेजला जोडलेले आहेत, तिथे नवा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे?, विद्यार्थ, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांना या संदर्भात विश्वासात घेतले गेले आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्र्यांनी द्यावीत असे इर्शाद शेख यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu